मुंबई : संजय लीला भन्साळीच्या घरासमोर राजपूत संघटनेचं आंदोलन
Continues below advertisement
पद्मावती चित्रपटाचा विरोध आता आणखी तीव्र झाला आहे. आज रजपूत संघटनेतर्फे संजय लीला भन्साळींच्या जुहू इथल्या घरासमोर आंदोलन करण्यात आलं. यावेळी त्यांनी पद्मावती चित्रपट थांबवण्याची मागणी केली. परिस्थिती चिघळू नये म्हणून पोलिसांनी त्वरित हस्तक्षेप करत आंदोलकांना ताब्यात घेतलं. पद्मावती चित्रपटात राणी पद्मावती आणि अल्लाउद्दीन खिलजी यांच्यात आक्षेपार्ह चित्रण दाखवलं, राणी पद्मावतीचं चुकीचं चित्रण चित्रपटात केलं गेलं असा आंदोलकांचा आरोप आहे, मात्र या चित्रपटात राणी पद्मावती आणि अल्लाउद्दीन खिलजी यांच्यात कोणताच आक्षेपार्ह सीन नसल्याचं संजय लीला भन्साळी यांनी स्पष्ट केलंय. मात्र तरीही हा विरोध कमी होताना दिसत नाही.
Continues below advertisement