मुंबई : जोगेश्वरीतील रुग्णालयात उंदराने रुग्णाचा डोळा कुरतडला

Continues below advertisement
मुंबईतल्या जोगेश्वरीतील बाळासाहेब रूग्णालयात रूग्णाच्या उजव्या डोळ्याला उंदराने कुरतडल्याचा प्रकार घडलाय.
27 वर्षीय परविंदर गुप्ता यांच्यासोबत 22 एप्रिलला ही घटना घडलीये.
मूळचे ठाण्याचे रहिवासी असणारे परविंदर यांचा गेल्या महिन्यात अपघात झाला होता. त्यानंतर त्यांना बाळासाहेब रूग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र 8 मार्चनंतर ते कोमामध्ये गेले. गेल्या आठवड्यात त्यांना जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आलं. तेव्हाच उंदराने त्यांच्या उजव्या डोळ्याला कुरतडलं. दरम्यान केवळ रूग्णालयाची बदनामी करण्यासाठी डॉक्टरांचा एक ग्रुप हे पसरवत असल्याचा आरोप रूग्णालय प्रशासनाने केलाय. या बदनामीमागे डॉक्टरांच्याच एका ग्रुपचा हात असल्याचा रूग्णालय प्रशासनाचा दावा आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram