आसाराम बापू फैसला : आसारामला जन्मठेपेची शिक्षा द्या, सरकारी वकीलाची मागणी
Continues below advertisement
आसारामविरोधातील बलात्कार प्रकरणात महत्वपूर्ण निकाल आहे. न्यायालयानं आसारामसह तिघांना दोषी ठरवलं. तर दोघांची निर्दोष मुक्तता झाली आहे. आसाराम, शिल्पी, शरद यांना दोषी ठरविण्यात आलंय. तर शिवा आणि प्रकाश यांची निर्दोष मुक्ता करण्यात आली आहे. आसाराम याच्या मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील आश्रमात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून आसारामला अटक करण्यात आली होती. आसारामने जोधपूरनजीकच्या मनाई भागातील आश्रमात बोलावून १५ ऑगस्ट २०१३ च्या रात्री मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे.
Continues below advertisement