आसाराम बापूचा फैसला : निकालाच्या पार्श्वभूमीवर जोधपूरसह उत्तर भारतात कडेकोट बंदोबस्त
Continues below advertisement
स्वयंघोषित वादग्रस्त आध्यात्मिक गुरू आसाराम बापू याच्याविरोधात सुरू असलेल्या बलात्कार प्रकरणाचा निकाल न्यायालय आज जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर जोधपूर तुरुंग परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. राजस्थान उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार, विशेष न्यायालय जोधपूर मध्यवर्ती कारागृहाच्या परिसरात हा निकाल जाहीर करणार आहे. सकाळी साडेदहापर्यंत निकाल अपेक्षित आहे.
Continues below advertisement