जोधपूर : काळवीट शिकार प्रकरण : सलमान खानचं पुढे काय होणार
20 वर्षांपूर्वीच्या काळवीट शिकारप्रकरणी दोषी ठरलेल्या अभिनेता सलमान खानला 5 वर्षांची शिक्षा आणि दहा हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.
कोर्टाने शिक्षा सुनावल्यानंतर त्याची रवानगी जोधपूर तुरुंगात करण्यात आली. त्याला कैदी क्रमांक 106 देण्यात आला आहे. जोधपूर तुरुंगात त्याने संपूर्ण रात्र काढली. चार चादरी घेऊन तो रात्रभर जमिनीवर झोपला. तुरुंगातलं जेवणही त्याने नाकारलं. सलमानला वरण-भात, पत्ता गोबी आणि चपाती देण्यात आली, मात्र त्याने या जेवणाला नकार दिला.
सलमानच्या वकिलांकडून कालच जोधपूर सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता, ज्यावर आज सुनावणी होईल. त्यामुळे सलमानच्या लाखो चाहत्यांचं लक्ष आता जोधपूर सत्र न्यायालयाच्या निर्णयाकडे आहे. सकाळी साडे दहा वाजता या अर्जावर सुनावणी होऊ शकते.