जोधपूर : काळवीट शिकार प्रकरण : सलमानचा जामीन, वकील प्रदीप घरत यांची प्रतिक्रिया

काळवीट शिकार प्रकरणात जोधपूर कारागृहात असलेल्या अभिनेता सलमान खानच्या जामीनावरचं संकट कायम आहे. कारण दोन रात्री जेलमध्ये काढलेल्या सलमानच्या जामीनावर आज सुनावणी होणं अपेक्षित आहे. मात्र या जामीनावर सुनावणी करणारे न्यायाधीश आर के जोशी यांची बदली झाली आहे.

न्यायाधीश रवींद्र जोशी यांच्यासह 87 न्यायाधीशांची बदली झाली आहे. ही नियमित बदली असल्याचं सांगण्यात येत आहे.

त्यामुळे सलमानच्या जामीनावरील सुनावणीचं संकट कायम आहे.

सलमान खानच्या हिट अँड रन खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून ज्यांनी काम पाहिलं, त्या प्रदीप घरत यांची प्रतिक्रिया पाहूया

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola