श्रीनगर: दहशतवाद्यांचे मृतदेह थेट अज्ञातस्थळी पुरणार
Continues below advertisement
अतिरेक्यांचा खात्मा केल्यानंतर त्यांचे मृतदेह कुटुंबीयांकडे अंत्यविधीसाठी सोपवले जात होते. मात्र, आता अतिरेक्यांचे मृतदेह कुटुंबीयांना न सोपवण्याचा मोठा निर्णय भारतीय सैन्यानं घेतला आहे. अतिरेक्यांच्या अंत्ययात्रेला ज्या पद्धतीनं गर्दी होते, भडकाऊ भाषणं होतात, त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता काश्मीरमधील अतिरेक्यांचे मृतदेह अज्ञातस्थळी पुरण्यात येणार आहेत.
Continues below advertisement