नवी दिल्ली : कोळसा घोटाळ्यात झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडांसह चारजण दोषी

Continues below advertisement
यूपीए सरकारच्या काळात गाजलेल्या कोळसा घोटाळाप्रकरणी झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा यांना दिल्लीच्या विशेष सीबीआय कोर्टानं आज (बुधवार) दोषी ठरवलं आहे. मधू कोडा यांच्याशिवाय माजी सचिव एच सी गुप्ता यांच्यासह एकूण चार जणांनाही दोषी ठरवण्यात आलं आहे. त्यांच्या शिक्षेबाबात उद्या (गुरुवार) कोर्टात युक्तीवाद होणार आहे.

अनियमित पद्धतीनं कोळसा खाणीच्या कंत्राटांचे वाटप करण्यात आल्याचा आरोप मधू कोडा आणि सचिव गुप्ता यांच्यावर करण्यात आले होते. या प्रकरणात इतरही बऱ्याच जणांचा समावेश आहे. यात एका चार्टर्ड अकाउंटेंटचाही समावेश आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram