रांची : झारखंडच्या हजारीबागमध्ये संपूर्ण कुटुंबाची आत्महत्या, कर्जबाजारीपणामुळे टोकाचं पाऊल

Continues below advertisement
नवी दिल्लीतील बुरारी कुटुंबीयांच्या आत्महत्येचं प्रकरण ताज असतानाच तिथे झारखंडमध्येही अशीच एक अघोरी घटना घडली आहे.
झारखंडमधल्या हजारीबाग शहरात नरेश माहेश्वरी या व्यक्तीनं कुटुंबातल्या पाचही जणांची हत्या करून स्वता आत्महत्या केली आहे.
नरेश यांच्यावर तब्बल 50 लाखांचं कर्ज असल्याची माहिती आहे. हे कर्ज फेडण्यात अपयश आल्यानं आपण तणावात गेलो आणि त्यामुळे आपण आत्महत्या करत असल्याचं आत्महत्येपूर्वीच्या चिठ्ठीत म्हटलंय.
आज सकाळी नरेश यांनी सुरूवातीला आपले आई-वडिल आणि पत्नीला गळफास लावला. त्यानंतर अवघ्या 8 ते 10 वर्षांच्या दोन मुलांची गळा चिरून हत्या केली. आणि त्यानंतर गच्चीवरून आत्महत्या केली.
आजारपण, कर्ज यामुळे तणाव आला आणि त्यातूनच आपण आत्महत्या करतोय असं नरेश यांनी सूसाईट नोटमध्ये म्हटलंय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram