नवी दिल्ली : हवालाचे कोट्यवधी रुपये परदेशात नेणाऱ्या हवाई सुंदरीला अटक

Continues below advertisement
हवालाचे तब्बल तीन कोटी वीस लाख रुपये हाँगकाँगला घेऊन जाणाऱ्या एका हवाई सुंदरीला दिल्ली विमानतळावर अटक करण्यात आली आहे. महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय)ने जेव्हा छापा मारला त्यावेळी या हवाई सुंदरीकडे चार लाख ऐंशी हजार डॉलर सापडले. ही हवाई सुंदरी हाँगकाँगला जाणाऱ्या फ्लाइटमधील क्रू मेंबर होती. तिच्यासोबतच दिल्लीतील एका हवाला एजंटलाही अटक करण्यात आली आहे.

डीआरआयच्या एका मोठ्या अधिकाऱ्यानं एबीपी न्यूजला दिलेल्या माहितीनुसार, 7 ते  8 जानेवारीला रात्री दिल्ली विमानतळावर हाँगकाँगला जाणाऱ्या फ्लाईटवर छापा मारण्यात आला. यावेळी यातील एका हवाई सुंदरीच्या बॅगेमध्ये लाखो डॉलर सापडले. हे डॉलर अॅल्युमिनियम फॉईलमध्ये गुंडाळून ठेवले होते. या डॉलर्सचं भारतीय मूल्य तब्बल तीन कोटी वीस लाख रुपये एवढं आहे.

या हवाई सुंदरीला ताब्यात घेतल्यानंतर तिची कसून चौकशीही करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी एका हवाला एजंटलाही ताब्यात घेतलं. ही हवाई सुंदरी हे पैसे परदेशात पोहचवण्याचे काम करत होती.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram