पुणे : सोमवती अमावस्येनिमित्त जेजुरी गडावर यात्रा, भक्तांची मोठी गर्दी

Continues below advertisement
येळकोट येळकोट , जय मल्हारच्या निनादात सोन्याची जेजुरी दुमदुमन निघाली. सोमवती अमावस्येनिमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक जेजुरी गडावर दाखल झाले. पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास सोहळ्याला सुरुवात झाली. त्यांनतर पालखीचं प्रस्थान कऱ्हा नदीकडे झालं. पालखी सोहळा नदी पात्रात पोहोचल्यानंतर येळकोट येळकोट जय मल्हार ,सदानंदाचा येळकोट असा खंडोबाचा जयघोष झाला. भंडारा खोबऱ्याची मुक्तपणे उधळण करीत कऱ्हा नदीच्या तीरावर लाखो भक्तांच्या साक्षीनं देवाच्या पालखीला स्नान घालण्यात आलं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram