
पुणे : जेजुरी गडावर किरणोत्सवाचा उत्साह, खंडेरायाच्या मूर्तीवर सूर्यकिरणांचा अभिषेक
Continues below advertisement
खंडेरायाची सोन्याची जेजुरी आज सुवर्णप्रकाशानं न्हाऊन निघाली...सूर्याची तेजोमय किरणं थेट खंडेरायाच्या मूर्तीवर पडल्यानं निर्माण झालेली प्रभावळ डोळे दिपवणारी होती... पहाटे भूपाळी आरती झाल्यावर सूर्यनारायणानं आपल्या किरणांनी खंडोबाच्या मूर्तीला अभिषेकस घातला....खंडोबाची मानाची चैत्री यात्रा अवघ्या दोन दिवसांवर आली आहे.. या .यात्रेसाठी जेजुरीत भाविकांनी मोठी गर्दी केलीए.. पूर्वेकडून मंदिर परीसरातील दीपमाळ, नंदीमंडप पार करून ही किरणं थेट मूर्तीपाशी पोहोचली. खंडेरायाच्या मूर्तीला झालेल्या सूर्यकिरणांच्या अभिषेकाचे साक्षीदार झाल्याचं समाधान आणि आनंद भाविकांच्या चेहऱ्यावरही पाहायला मिळाला
Continues below advertisement