अहमदाबाद : जपानचे पंतप्रधान शिंजो आबे भारत दौऱ्यावर, साबरमती आश्रमात घेतलं गांधीजींचं दर्शन
Continues below advertisement
बुलेट ट्रेनच्या भूमिपूजनासाठी जपानचे पंतप्रधान शिंजो आबे सपत्निक अहमदाबादमध्ये दाखल झाले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: त्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर हजर होते.
अहमदाबादमध्ये दाखल झाल्यानंतर खास फुलांनी सजवलेल्या जीपमधून मोदी आणि आबे यांनी रोड शो केला. यावेळी आबे खास मोदी जॅकेटमध्ये तर त्यांच्या पत्नी भारतीय वेशात होत्या.
आबे यांनी सपत्निक साबरमती आश्रमाला भेट देऊन महात्मा गांधींच्या समाधीचं दर्शन घेतलं. गांधींच्या विचारधारेचं प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तीन माकडांची प्रतिकृती आबे यांना भेट दिली. 1 लाख कोटी रुपये खर्च असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी जपाननं 88 हजार कोटीचं कर्ज दिलंय. उद्या सकाळी त्याचं भूमीपूजन पार पडेल.