G20 Summit | जी 20 परिषदेत मोदी आणि ट्रम्प यांची भेट, इराण, व्यापार, फाईव्ह जीसह अनेक मुद्द्यांवर चर्चा | ABP Majha
जी 20 शिखर परिषदेच्या औपचारिक उद्घाटनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात सकाळी साडेसहा वाजता (भारतीय वेळेनुसार) द्विपक्षीय चर्चा झाली. यावेळी दोन्ही देशांमधील व्यापार, संरक्षण आणि 5 जी नेटवर्क या मुद्द्यांवर चर्चा झाली.