जम्मू काश्मीर : पुलवामात मोठा दहशतवादी हल्ला, चार जवान शहीद
जम्मू काश्मिरच्या पुलवामा भागात कमांडो ट्रेनिंग सेंटरवर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे चार जवान शहीद झाले असून काही जवान जखमी झाले आहेत. दोघा दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय लष्कराला यश आलं.