जम्मू काश्मीर : अमरनाथ यात्रेसाठी भाविकांचा पहिला जत्था रवाना
Continues below advertisement
बम बम भोले या जयघोषात अमरनाथ यात्रेसाठी भाविकांचा पहिला जत्था जम्मूमधून रवाना झाला आहे. उद्या या भाविकांना शिवलिंगाचं दर्शन होईल. श्रीनगरमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या दहशतवादी कारवायांमुळे यंदा भाविकांच्या सुरक्षेसाठी योग्य ते उपाययोजना केल्याचा दावा पोलीस प्रशासनाने केला आहे. भाविकांच्या सुरक्षेसाठी यंदा पहिल्यांदाच मोटरसायकल स्क्वॉडद्वारे सुरक्षा देण्यात आली आहे.
Continues below advertisement