जम्मू काश्मीर : अरनिया, सांबा, रामगड सेक्टरमध्ये गोळीबार, बीएसएफचंही प्रत्युत्तर
Continues below advertisement
पाकिस्तानने जम्मू काश्मीरच्या सांबा, रामगड आणि अरनिया सेक्टरमध्ये काल रात्रीपासून गोळीबाराला सुरुवात केली आहे. केवळ अरनिया शहरात ९० मिनिटात पाकिस्तानकडून २७ मोर्टार शेल डागण्यात आले आहेत. सीमा सुरक्षा दलाच्या जवानांकडूनही याला चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे. अलीकडेच पाकिस्तानने जम्मू काश्मीरमधल्या रहिवासी भागात आणि सीमा सुरक्षा दलाच्या चौक्यांवर गोळीबार केला होता. ज्यात एक भारतीय जवान शहीद झाला होता. त्याला भारताकडूनही चोख प्रत्युत्तर देण्यात आलं होतं.
Continues below advertisement