श्रीनगर : जम्मूतील सुंजवाँ कॅम्प ऑपरेशन संपलं, चार दहशतवाद्यांचा खात्मा, पाच जवान शहीद

Continues below advertisement
जम्मूच्या सुंजवाँमध्ये सैन्याच्या कॅम्पमध्ये सुरु असलेलं ऑपरेशन 30 तासांनी संपलं आहे. चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. चकमकीत पाच जवान शहीद झाले असून एका जवानाचे वडीलही हल्ल्यात मृत्युमुखी पडले आहेत.

दहशतावादी हल्ल्यात 9 जण जखमी झाले असून त्यामध्ये दोन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. काल (शनिवारी) पहाटे पाच वाजता दहशतवाद्यांनी सुंजवाँच्या आर्मी कॅम्पवर हल्ला केला होता. जवानांचं कुटुंबीय राहत असलेल्या भागाला दहशतवाद्यांनी लक्ष्य केलं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram