श्रीनगर : भारत-पाक फाळणीला जिना नाही, नेहरु-पटेल कारणीभूत : फारुख अब्दुल्ला

Continues below advertisement
जम्मू काश्मिरचे माजी मुख्यमंत्री डॉ. फारुक अब्दुल्ला यांनी भारत-पाकिस्तान फाळणीबाबत वक्तव्य करुन वाद उकरुन काढला आहे. फाळणीला जिना नाही, तर पंडित जवाहरलाल नेहरु आणि सरदार वल्लभभाई पटेल कारणीभूत आहेत, असं वक्तव्य फारुक अब्दुल्लांनी केलं.

जिना यांनी पाकिस्तानाची निर्मिती केली, असं जग मानतं, मात्र त्यात तथ्य नाही. पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यामुळे भारताचं विभाजन झालं आणि पाकिस्तानचा जन्म झाला, असं अब्दुल्ला म्हणाले. जम्मूतील 'चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री'ने चेंबर हाऊसमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram