जम्मू-काश्मीर : दहशतवाद्यांची घुसखोरीसाठी वापरली जाणारी शिडी जप्त
Continues below advertisement
कुपवाड्यातल्या केरन सेक्टरमध्ये भारतीय जवानांनी दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न गुरुवारी हाणून पाडला. रात्री चार ते पाच दहशतवादी सीमारेषा ओलांडून येत असताना जवानांनी त्यांना अडवलं. यानंतर दहशतवादी आणि भारतीय जवानांमध्ये बराच वेळ गोळीबार चालला. यादरम्यान दहशतवाद्यांनी आपलं सामान तसंच टाकून पळ काढला. यात मोठ्या प्रमाणात दारुगोळा, खाण्याचं सामान आणि दोन फोल्डिंगच्या शिडीचा समावेश आहे. हलक्या अॅल्युमिनीयमपासून बनवलेल्या या शिढीचं वजन फक्त दोन किलो असून २० फूट उंचीची शिडी फोल्ड केली तर ती फक्त ४ फुटांची होते. त्यामुळे घुसखोरी करताना तीचा वापर सहज शक्य आहे.
Continues below advertisement