दूध आंदोलन : जालन्यात दूध रस्त्यावर, पुण्यात दूध टंचाई, कोल्हापुरात दूध टँकर पेटवला

Continues below advertisement
दूध आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. मुंबईत अजूनही फारसा परिणाम जाणवत नसला तरी पुण्यात मात्र दुधाचा तुटवडा भासणार आहे. कारण, आज चितळे आणि कात्रज या पुण्यातल्या मोठ्या दूध डेअऱ्यांचं संकलन होणार नाही. त्यामुळे पुण्यात दुधाची समस्या भेडसावण्याची शक्यता आहे. पुण्याकडे येणाऱ्या दुधाच्या गाड्या आडवल्या जात आहेत. तर तिकडे जालन्यात स्वाभिमानीच्या शेतकऱ्यांनी दूध कोंडी केली आणि रस्त्यावर दूध फेकून दिलंय. जालना औरंगाबाद रोडवरच्या नागेवाडी इथे 4 हजार लीटर दूध फेकून देण्यात आलं. कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यात दूध दर आंदोलन काल रात्री आणखी तीव्र झालं. जयसिंगपूर रेल्वे स्टेशन परिसरात गोकूळ दुधाचा टँकर आंदोलकांनी पेटवला. रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram