महाराष्ट्र केसरी 2018 | जालना | बाला रफिक शेख माती विभागातून अंतिम फेरीत | एबीपी माझा

Continues below advertisement
बुलडाण्याचा पैलवान बाला रफिक शेखनं महाराष्ट्र केसरीच्या माती विभागातून अंतिम फेरीत धडक मारली आहे. बाला रफिक शेखनं माती विभागाच्या फायनलमध्ये रत्नागिरीच्या संतोष दोरवडला चीतपट केलं. बाला रफिक शेख हा कोल्हापूरच्या न्यू मोतीबाग तालमीत हिंदकेसरी गणपतराव आंदळकरांच्या तालमीत तयार झालेला पठ्ठ्या आहे. सध्या तो वारजेच्या जय हनुमान कुस्ती केंद्रात वस्ताद गणेश दांगट यांच्याकडे सराव करतो.
जालन्याच्या आझाद मैदानावर आता महाराष्ट्र केसरी किताबासाठी गतविजेता अभिजीत कटके आणि बाला रफिक यांच्यात लढत रंगणार आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram