जालना : कष्टाने पिकवलेल्या कोबीला कवडीमोल भाव, शेतकऱ्याने फावड्याने गड्डे फोडले
Continues below advertisement
कष्टाने पिकवलेल्या कोबीला योग्य दर मिळत नसल्याने जालन्यातील एका शेतकऱ्याने निराशेपोटी आपल्या शेतातील कोबीचे गड्डे फावड्याने फोडले. तर टोमॅटो फेकून दिले. प्रेमसिंग चव्हाण असं या शेतकऱ्याचं नाव असून जालन्याच्या पाहेगावात त्यांची शेती आहे. तीन महिन्यापूर्वी प्रेमसिंग चव्हाण यांनी अर्धा एकरात कोबीची लागवड केली होती. तयार झालेला कोबी त्यांनी बाजारपेठेत विक्रीस नेला. मात्र, त्यांच्या कोबीला अक्षरश: कवडीमोल दर मिळाला. वाहतूक खर्चही निघत नसल्याने प्रेमसिंग चव्हाण हतलब झाले आणि कोबीची गड्डे फावड्यने फोडून आपला संताप व्यक्त केला.
Continues below advertisement