EXCLUSIVE : जालना : रावसाहेब दानवेंना सत्तेचा माज, माझ्या धाकामुळे ते जमिनीवर : अर्जुन खोतकर
Continues below advertisement
भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना सत्तेची मस्ती, सत्तेचा माज आणि सत्तेची गुर्मी आहे. माझ्या धाकामुळे त्यांचे हेलिकॉप्टर जमिनीवर आहे, असा घणाघात शिवसेनेचे मंत्री अर्जुन खोतकर यांनी दानवेंवर केला आहे. त्यांनी एबीपी माझाशी खास बातचित केली.
“जालना जिल्ह्यातील अधिकाऱ्यांवर दानवेंचा प्रचंड दबाव असून, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, तहसीलदार प्रचंड दहशतीखाली आहेत. दानवे जिल्हाधिकाऱ्यांना आणि पोलीस अधीक्षकांना 4-4 तास बाहेर उभं करतात, त्यांना घर गड्यासारखं वागवतात. दानवे आणि त्यांच्या कुटुंबाकडून सत्तेचा गैरवापर सुरु आहे.” असा आरोप खोतकरांनी दानवेंवर केला.