जळगाव : 26/11 हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात, नवाज शरीफांच्या विधानावर उज्ज्वल निकमांची प्रतिक्रिया
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुंबईवर झालेल्या 26/11च्या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याची पहिल्यांदाच जाहीर कबुली खुद्द पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी दिलीय...पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा धक्कादायक गौप्यस्फोट केलाय...विशेष म्हणजे हल्ल्यानंतर वेळीवेळी पाकिस्तानवर आरोप झाले,....मात्र पाकिस्ताननं दरवेळी कांगावा करत सर्व आरोप फेटाळून लावले...मात्र शरीफ यांच्या रुपानं पाकिस्तानच्या खोटारडेपणाचा बुरखा पुन्हा एकदा फाटलाय...पनामा पेपर्सप्रकरणी नवाज शरीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत...यानंतर त्यांना पंतप्रधानपदावरुन पदच्चुत करण्यात आलंय..