रावेर, जळगाव : सरकारकडून जळगाव जिल्ह्यावर अन्याय, सुप्रिया सुळेंचा आरोप
राष्ट्रवादी काँग्रेसचं हल्लाबोल आंदोलन आज जळगाव जिल्ह्यातील रावेरमध्ये पोहोचलं. यावेळी सरकार जळगाव जिल्ह्यावर अन्याय करत आहे. सरकारमधल्या अनेक मंत्र्यांवर आरोप झाले. मात्र, फक्त जळगावच्याच मंत्र्याला काढलं, अशा शब्दात सुळे यांनी खडसेंचं नाव न घेता सरकारवर टीका केली. तसच मंत्रालयावर जाळ्या बसवण्यापेक्षा सरकारनं शेतकऱ्यांशी बोलून, त्यांच्या समस्या सोडवायला हव्या, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.