जळगाव | वादळी पावसामुळे केळी पिकाचं मोठं नुकसान
जळगाव जिल्ह्यातल्या रावेर तालुक्यात वादळी पावसानं केळी पिकाचं मोठं नुकसान केलं आहे. आधीच विविध संकटांनी अडचणीतअसलेल्या शेतकऱ्यांना या वादळी पावसाने अजुन अडचणीत वाढ केली आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांचीही मोठी दुर्दशा झालीय. कालपासून पावसाने विश्रांती घेतलेली असली तरी अद्यापही ढगाळ वातावरण आहे.