जळगाव : खड्ड्यामुळे रिक्षात प्रसुती झालेल्या महिलेचा मृत्यू
Continues below advertisement
रस्त्याच्या दुरावस्थेमुळं रिक्षात महिलेची प्रसूती झाल्याची घटना जळगावात घडली. मात्र प्रसूतीवेळी महिलेचा मृत्यू झाला आहे. कविता खंडारे अस या मृत महिलेचं नाव आहे. प्रसुतीवेळी रक्तस्त्राव मोठया प्रमाणात झाल्यानं महिलेचा मृत्यू झाला. मात्र बाळाला वाचवण्यात डॉक्टरांना यश आलं. दरम्यान या घटनेनंतर ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला. लवकरात लवकर रस्ता दुरुस्तीची मागणी स्थानिकांनी केली. राज्यभरात सध्या अनेक रस्ते खड्डेमय झाले.
Continues below advertisement