जळगाव : विहिरीत पोहल्याच्या कारणातून तीन मुलांना मारहाण, गिरीश महाजन पीडितांच्या भेटीला
जळगावच्या घटनेनंतर महाराष्ट्रात संतापाची लाट पाहायला मिळते आहे. आता राजकीय पक्षाचे नेते वाकडी गावात दाखल होत आहेत. जलसंपदामंत्री गिरिश महाजन यांनीही गावाला भेट दिली आणि पीडितांची विचारपूस केली. तर काँग्रेसतर्फे आज एक पथक गावात दाखल झालं.त्यात अब्दुल सत्तार आणि राजू वाघमारेंचा समावेश आहे. मात्र पोलिसांनी आरोपींच्या दबावाला बळी पडून पंचनाम्यात घटनेतली विहीरच बदलल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय..त्यामुळं पोलीस ही घटना दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचं चित्र दिसतंय..
जळगाव जिल्ह्यातील वाकडी गावात १० जून रोजी विहिरीत पोहण्याच्या कारणावरुन तीन मुलांना बेदम मारहाण केली आणि गावात धिंड काढली . या मारहाणीचा व्हीडिओ सध्या व्हायरल होतोय यानंतर २ आरोपींना अटक करण्यात आली आहे.