जळगाव : आंबा आकर्षक दिसण्यासाठी घातक रसायनांचा वापर, 10 टन आंबे जप्त

Continues below advertisement
सध्या आंब्याचा सिझन सुरु असल्याने आपण सगळेच पिवळे दिसणारे आंबे खरेदी करतो. पण हेच आंबे खाणं आपल्याला चांगलच महागात पडू शकतं.  आंबे आकर्षक दिसण्यासाठी आंबा विक्रेते आरोग्याला घातक असलेल्या रसायनांचा वापर करतायत. कॅल्शियम कार्बाईड आणि रासायनिक फवारणी करुन आंबा कृत्रिमरित्या पिकवल्या जातोय. . त्यामुळे जळगाव महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरात अनेक ठिकाणी छापे टाकून १० टन आंबा जप्त केलाय. महापालिका आणि अन्न व औषध प्रशासनाच्या या कारवाईमुळे आंबा विक्रेत्यांचे मात्र धाबे दणाणले आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram