जळगाव : कर्जमाफीसाठी बँकेत चकरा मारण्याऐवजी शेतात राबा, गुलाबराव पाटलांचा सल्ला

Continues below advertisement
जळगावमध्ये कर्जमाफी तसेच बोन्डआळीच्या मदतीची चौकशी करण्यासाठी बँकांच्या चकरा मारण्याऐवजी शेतात राबा असा अजब सल्ला सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी शेतकऱ्यांना दिलाय. तसेच गुलाबरावांची हीच री जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी देखील ओढली आहे. कापसाला भाव मागण्यापेक्षा शास्त्रोक्त शेती करुन उत्पादन दुपटीनं वाढवा असा उपदेशाचा ढोस गिरीश महाजन यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.
दरम्यान 2011 साली राज्यात आघाडी सरकार असताना गिरीश महाजन यांनीच कापसाला प्रतिक्विंटल 7 हजार दर मिळावा यासाठी अकरा दिवसांचं लाक्षणिक उपोषण केलं होतं. परंतु मंत्री पद मिळाल्यानंतर मात्र त्यांची भाषा बदलली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram