जळगाव : पक्षाचा वटवृक्ष करणारेच आज उन्हात, खडसेंची घुसमट पुन्हा बाहेर
Continues below advertisement
पक्षाचा वृक्ष वाढवून वटवृक्ष करणारे आज बाहेर उन्हात बसले आहेत, अशा शब्दांत एकनाथ खडसेंनी पुन्हा आपली नाराजी व्यक्त केली. काल जळगाव जिल्ह्यातल्या बोदवड इथं मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेच्या कोणशिला प्रसंगी खडसे बोलत होते.
"आपल्यावरच्या आरोपांवर सरकारला पुरावे मिळाले का, याचं उत्तर सरकारनं जाहीरपणे जनतेला द्यायला हवं, असाही पुनरुच्चार त्यांनी केला. तसेच ज्यांच्यासाठी लाठ्या-काठ्या खाल्ल्या, तोच आज बाहेर आहे," असंही ते यावेळी म्हणाले.