पाडव्याच्या मुहूर्तावर सोने खरेदीसाठी मोठी गर्दी | जळगाव | एबीपी माझा
Continues below advertisement
यंदा राज्यभरात दुष्काळी परिस्थिती असल्याने सोने व्यवसायावर परिणाम होईल असा अंदाज अनेक सोने व्यावसायिकांनी वर्तविला होता. मात्र सर्व अंदाज साफ खोटे ठरले असून पाडव्याच्या मुहूर्तावर कोट्यावधी रुपयांची उलाढाल जळगावच्या सुवर्णनगरीत झाल्याचे पाहायला मिळाले आहे. आज पाडव्याच्या मुहूर्तावर सोने खरेदीसाठी मोठी गर्दी उसळल्याचे चित्र आहे. जळगावची सुवर्णनगरी देशभरात शुद्ध सोन्यासाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणच्या सोन्याच्या विश्वसनियतेमुळे जळगाव जिल्ह्यातूनच नव्हे तर संपूर्ण देशभरातून अनेक ग्राहक सोने खरेदीसाठी गर्दी करत असतात.
Continues below advertisement