जळगाव : खडसेंच्या अंगणात शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या मतदार संघातील मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. खडसेंच्या दृष्टीने प्रतिष्ठेच्या असलेल्या जळगावातील या निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील मुक्ताई नगर पंचायत निवडणुकीसाठी आज पहिलं मतदान होत आहे. लोकनियुक्त नगराध्यक्ष आणि 17 नगरसेवकांच्या जागांसाठी ही निवडणूक होत आहे.