जळगाव : चाळीसगावच्या बीडीओंचं कार्यालयातच विषप्राशन
चाळीसगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱी मधुकर वाघ यांनी कार्यालयातच विष प्राशन केल्यानं खबळबळ उडालीय. सध्या मधुकर वाघ यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पंचायत समितीच्या सभागृहात सभापतींच्या अध्यक्षतेखाली मासिक सभा सुरु होती. या दरम्यान मधुकर वाघ हे आपल्या कक्षात बसले होते. त्यावेळी वाघ यांनी विषारी द्रव्य सेवन केलं.