जळगाव : खरे मर्द असाल तर हायकोर्टात लढून दाखवा, दमानियांचं खडसेंना आव्हान
Continues below advertisement
जळगाव : खरे मर्द असाल तर आपल्या विरोधात हायकोर्टात लढून दाखवा, असे आव्हान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना दिले आहे. तसेच, मुद्याच्या लढाईमध्ये असे दहा खडसे आणि दहा भुजबळ एकत्र आले, तरी आपण त्यांच्याविरोधात लढा देऊ, असेही त्या म्हणाल्या. अंजली दमानिया यांनी जळगावात पत्रकारांशी संवाद साधला.
आपल्याला बदनाम करण्यासाठी अंजली दमानिया यांनी आपल्या विरुद्ध बनावट दस्ताऐवज आणि बनावट चेक तयार करुन उच्य न्यायालयाची दिशाभूल केल्याचे खडसे यांनी पत्रकार परिषद घेऊन म्हटले होते. याच कारणास्तव त्यांनी मुक्ताईनगर न्यायालयात फिर्याद दाखल करुन, दमानिया यांच्या विरोधात विविध कलमांखाली मुक्ताईनगर पोलीस स्थानकात गुन्हे दाखल केले होते. या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज अंजली दमानिया यांनी जळगाव येथे पत्रकार परिषद घेतली होती.