स्पेशल रिपोर्ट | लातूर | जलयुक्त की जलमुक्त? मुख्यमंत्र्यांच्या ड्रीम प्रोजेक्टचं काय होणार?
जलयुक्त शिवारमुळे 16 हजार गावं दुष्काळमुक्त झाल्याचा फडणवीस सरकारचा दावा फोल असल्याचं समोर आलं आहे. मागील पाच वर्षांचा भूजल पातळीचा अभ्यास केल्यानंतर यावर्षी 14 हजार गावांतील भूजल पातळीत 1 मीटर घट आढळून आल्याचा अहवाल भूजल सर्वेक्षण आणि विकास विभागाने दिला आहे. सप्टेंबर 2018 च्या अखेरीस आणि ऑक्टोबर महिन्यात सादर केलेल्या सर्वेक्षणात अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे