खेळ माझा : राष्ट्रीय ज्युनियर कुस्तीत स्वाती शिंदेला सुवर्णपदक
Continues below advertisement
जयपूरमध्ये नुकत्याच आयोजित राष्ट्रीय ज्युनियर कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राच्या स्वाती शिंदेनं सुवर्णपदकाची, तर प्रतीक्षा देबाजे आणि ऋतुजा सकपाळ यांनी प्रत्येकी एका कांस्यपदकाची कमाई केली. विशेष म्हणजे त्या तिघीही कोल्हापुरातल्या मुरगुडच्या सदाशिवराव मंडलिक साई कुस्ती केंद्राच्या पैलवान आहेत. स्वाती शिंदेनं सलग तीन कुस्त्या जिंकून या स्पर्धेत ५३ किलो वजनी गटाचं सुवर्णपदक जिंकलं. प्रतीक्षा देबाजे आणि ऋतुजा सकपाळला आपापल्या गटात कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं.
Continues below advertisement