व्हीजेटीआय कॉलेजमध्ये भरलं इस्रोचं प्रदर्शन | मुंबई | एबीपी माझा

मुंबईच्या व्हीजेटीआय कॉलेजमध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने एक प्रदर्शन आयोजन केले आहे. इथे आपल्याला इस्रोच्या आज पर्यंतच्या सर्व मोहिमांची माहिती मिळू शकेल. त्याचसोबत इथे भारताने सोडलेल्या उपग्रहांच्या प्रतिकृती देखील ठेवण्यात आलेल्या आहेत. इथे इस्रोचे काही शात्रज्ञ देखील आहेत, जे तुमच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकतात. शनिवार आणि रविवार हे प्रदर्शन असेल. इस्रो. भारताची अंतराळ संशोधन संस्था, आतापर्यंत इस्रोनं अनेक यान अवकाशात सोडले. मात्र इस्रो म्हणजे नेमकं काय, तिथले रॉकेट्स कसे असतात, कशाप्रकारे काम सुरू असतं, या बाबी जाणून घेण्यासाठी, मुंबईतल्या व्हीजेटीआय कॉलेजमध्ये प्रदर्शन भरवण्यात आलं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola