सांगली : पश्चिम महाराष्ट्रातील 'रॉबिनहूड' बापू बिरु वाटेगावकर काळाच्या पडद्याआड
सांगली-साताऱ्यासह पश्चिम महाराष्ट्रात ‘रॉबिनहूड’प्रमाणे आयुष्य जगलेले बापू बिरु वाटेगावकर यांचं निधन झालं. ते 96 वर्षांचे होते. इस्लामपुरातील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बापू बिरु वाटेगावकर अर्थात आप्पा यांचं वाळवा तालुक्यातील बोरगाव हे गाव. बोरगावचा ढाण्या वाघ म्हणून ते परिचित होते.