इस्लामाबाद : कुलभूषण जाधव यांची आई आणि पत्नीशी भेट, मात्र थेट बोलणं नाहीच!
कथित हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानच्या जेलमध्ये कैदेत असलेले भारतीय नौदलाचे माजी कमांडर कुलभूषण जाधव अखेर कुटुंबीयांना भेटले. इस्लामाबादस्थित पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयात कुलभूषण जाधव यांनी त्यांची आई आणि पत्नीची तब्बल दीड वर्षांनंतर भेट घेतली.
कुलभूषण जाधव यांची आई आणि पत्नी इस्लामाबाद येथे दाखल झाल्या. त्यानंतर कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत त्यांना पाकिस्तानातील भारतीय दुतावासात नेण्यात आलं. तिथून त्यांना परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयात नेण्यात आलं. जिथे कुलभूषण आणि त्यांची भेट ठरली होती.