VIDEO | 'पुन्हा गरीबी हटाओ' कॉंग्रेसला तारणार? | माझा विशेष | एबीपी माझा
लोकसभेच्या तोंडावर राहुल गांधींनी केलेली मोठी घोषणा ऐकल्यानंतर तुम्हाला इंदिरा गांधींची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. इंदिरा गांधींनी गरीबी हटावचा नारा देऊन सत्ता मिळवली होती आणि आता राहुल गांधींनी आजींच्या पावलावर पाऊल ठेवत गरिबी हटावचा नारा दिला असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. कारण देशातील 20 टक्के गरीब कुटुंबांना वर्षाला 72 हजार रुपये उत्पन्न मिळवून देण्याची योजना राहुल गांधींनी मांडली आहे. बँकेत 15 लाख जमा करण्याचं आश्वासन देत मोदी पंतप्रधानांच्या खुर्चीवर विराजमान झाले. आता राहुल गांधींचं 72 हजाराचं आश्वासन काँग्रेसला कितपत यश मिळवून देणार हे पाहावं लागेल.