मुंबई : अभिनेता इरफान खानला न्यूरोएन्डोक्राईन ट्यूमरने ग्रासलं, उपचारासाठी विदेशात जाणार
Continues below advertisement
बॉलिवूड अभिनेता इरफान खानला न्यूरोएन्डोक्राईन ट्यूमर झाल्याचं निदान झालं आहे. खुद्द इरफाननेच ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे. मार्गारेट मिशेल यांचा कोट पोस्ट करुन इरफानने आपल्या आयुष्याचं अस्ताव्यस्त झालेलं चित्र चाहत्यांसमोर मांडलं.
'आपण अपेक्षा करतो, ते देणं आयुष्यासाठी बंधनकारक नाही' या आशयाचा मार्गारेट मिशेल यांचा कोट इरफानने पोस्ट केला आहे. त्यानंतर 'न्यूरोएन्डोक्राईन ट्यूमर'चं निदान झाल्याची माहिती इरफानने दिली. इरफानने ही पोस्ट ट्विटरला पिन केली आहे.