पेट्रोल फक्त 1 पैशांनी स्वस्त, तेल कंपनीकडून जनतेची फसवणूक
Continues below advertisement
पेट्रोल डिझेल स्वस्त करण्याच्या नावाखाली तेल कंपन्यांनी जनतेची अक्षरश: चेष्टा केली आहे. मागचे १६ दिवस इंधनदरवाढ सोसल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अवघ्या एका पैशाची घट करण्यात आली आहे. सकाळी पेट्रोलच्या दरात ६० पैशांनी घट झाल्याची माहिती सरकारी तेल कंपन्यांच्या वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आली होती. मात्र अवघ्या काही तासात यावर तेल कंपन्यांनी पलटी मारली आहे. टायपिंग मिस्टेकमुळे संकेतस्थळावर चुकीची माहिती प्रकाशित झाल्याचं स्पष्टीकरण तेल कंपन्यांकडून देण्यात आलं.
दरम्यान फामपेडाचे अध्यक्ष उदय लोध यांनी काय प्रतिक्रिया दिलीय पाहूयात...
दरम्यान फामपेडाचे अध्यक्ष उदय लोध यांनी काय प्रतिक्रिया दिलीय पाहूयात...
Continues below advertisement