Yoga Day 2019 | जवानांचा राष्ट्रयोग, आयटीबीच्या जवानांचा रिव्हर योगा | अरुणाचल प्रदेश | ABP Majha
अरुणाचल प्रदेशातल्या इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलिस अर्थातच आयटीबीच्या नवव्या बटालियनच्या जवानांनी रिव्हर योगा केलाय. लोहितपूर येथील दिगारू नदीत जवानांनी पाण्याखाली योगासनं सादर केली. तर, दुसरीकडे याच आयटीबीपीच्या पथकासोबत योग दिन साजरा करण्यासाठी चक्क अश्व आणि श्वान पथकातील सदस्यांनी हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं.