Triple Talaq | तात्काळ तिहेरी तलाकविरोधी विधेयक लोकसभेत सादर, विरोधकांचा गोंधळ | ABP Majha
लोकसभेत आज पुन्हा एकदा तात्काळ तलाकविरोधी विधेयक सादर करण्यात आलं. 17 व्या लोकसभेच्या स्थापनेनंतर नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाचं हे पहिलं विधेयक आहे. केंद्रीय कायदा मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी जोरदार गोंधळातच हे विधेयक सादर केलं. मोदी सरकारच्या मागच्या कार्यकाळातही तात्काळ तलाकविरोधी विधेयक मांडलं होतं. विधेयक लोकसभेत मंजूर झालं, मात्र राज्यभेत त्याला मंजुरी मिळू शकली नाही.