इंदूर/ मध्य प्रदेश : मॉडेलची छेडछाड, मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
Continues below advertisement
इंदूरमध्ये दुचाकीवरुन जाणाऱ्या मॉडेलच्या छेडछेडीच्या घटनेनं मध्य प्रदेश पोलीस अडचणीत आले आहेत. इथं पोलिसांनीच पीडित महिलेशी संपर्क साधून आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. कारण पीडित मॉडेलनं तिच्यासोबत दोन नराधमांनी केलेल्या छेडछाडीसंबंधीत व्हिडीओ ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. विशेष म्हणजे, हे ट्वीट मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी रिट्विट करत पीडित मॉडेलला न्याय देण्याचे आदेश डीआयजी आणि कलेक्टरला दिले आहेत. व्हिडीओत त्या दोन नराधमांनी स्कर्ट खेचण्याचा प्रयत्न केला, शिवाय असभ्य भाषेचा वापर केल्याचंही म्हटलं आहे. त्यामुळे गाडीवरुन खाली पडून दुखापतग्रस्त झाल्याचं पीडित मॉडेलनं म्हटलं आहे.
Continues below advertisement