इंदूर : भरवस्तीत बिबट्याचा धुमाकूळ, 4 तासांच्या थरारनाट्यानंतर बिबट्या जेरबंद

Continues below advertisement
इंदूरमध्ये बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनअधिकाऱ्यांची तब्बल 4 तासांची झुंज दिली. भरवस्तीत घुसलेला बिबट्या पहिल्यांदा रहिवाशांनी पाहिला. आणि त्याची माहिती पोलीस आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर बिबट्याला जेरबंद करण्यासाठी अधिकाऱ्यांची नाट्यमय कसरत सुरू झाली. सगळ्या गदारोळात बिबट्या आणखी बिथरला आणि सैरावैरा धावू लागला. अखेरीस 4 तासांच्या प्रयत्नांनंतर बिबट्याला कैद करण्यात यश मिळालं. परंतू यादरम्यान बिबट्यानं केलेल्या हल्ल्यात 3 जण जखमी झाले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram