इंदूर : भय्यू महाराजांच्या पार्थिवावर आज दुपारी 1 वाजता अंत्यसंस्कार
Continues below advertisement
अध्यात्मिक गुरु भय्यूजी महाराज यांच्यावर आज दुपारी एक वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्याआधी त्यांचं पार्थिव सूर्योदय आश्रमात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलंय. अनेकांना आयुष्य जगण्याची कला शिकवणारे, चिंता आणि भयातून मुक्त कऱणाऱ्या भय्यू महाराजांनी काल राहत्या घरी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली.
या घटनेमुळे राजकीय, सामाजिक आणि अध्यात्मिक विश्व हादरुन गेलं.
आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी आपण थकलो असून महादेवाला शरण जात असल्याचं म्हटलंय. तसंच आपल्या कुटुंबाची काळजी घेण्याचं आवाहन केलंय.
दरम्यान भय्यू महाराजांनी स्वत:चं जीवन आर्थिक विवंचनेतून संपवलं की कौटुंबिक कारणावरुन हे समजू शकलेलं नाही. मात्र काँग्रेसनं भय्यू महाराजांच्या आत्महत्येची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.