नवी दिल्ली : 'भीम' अॅपवरुन रेल्वे तिकीट बुक केल्यास पाच लकी प्रवाशांना मोफत प्रवासाची संधी
Continues below advertisement
भारतीय रेल्वेने कॅशलेस व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी नवी योजना सुरु केली आहे. रेल्वेच्या नव्या स्कीममध्ये आता तुम्ही भीम अॅपच्या माध्यमातून तिकीट बुकिंग करु शकता. या अॅपच्या माध्यमातून बुकींग केल्यास रेल्वेतर्फे प्रवाशांना एक खास ऑफर देण्यात येणार आहे. या योजनेनुसार प्रत्येक महिन्याला 5 प्रवाशांना फ्रीमध्ये प्रवास करण्याची संधी मिळणार आहे.
Continues below advertisement